महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी : ( दहिवडी)
माण खटाव मधील एकमेव नगरपालिका असणारे म्हसवड शहरात मोठया प्रमाणावर कोरोना रुग्ण आहेत. बऱ्याच वेळा शहर बंद ठेवले होते आता ही म्हसवड बंद आहे. मात्र शहरातील काही मोठे व्यापारी जास्त पैशाच्या हव्यासापोटी अर्धे शटर उघडे ठेऊन ग्राहकांना आत बोलावून मालाची विक्री करत असल्यामुळे कोरोनाची साखळी वाढायला मदत होत आहे.
पालिका प्रशासन वारंवार बंद पुकारत मात्र मोठ्या व्यापाऱ्यांना याचे काहीच देणे घेणे नाही असे वाटत असल्यामुळे म्हसवड बंद ठेऊन ही काहीच फरक पडणार नाही. रुग्ण संख्या ही वाढत जाण्याची शक्यता आहे. मात्र नगरपालिका आणि म्हसवड पोलीस यांच्यावर लक्ष ठेऊन कारवाई का करत नाहीत असा सवाल जनतेतून निर्माण होत आहे. या लालची व्यापाऱ्यांची टेस्ट झाली पाहिजे किंवा या व्यापाऱ्यांनी स्वतः समोर येउन टेस्ट करून घेतली तर कोरोनाचा संसर्ग कमी होऊ शकतो. पण अद्याप अजून कोणीही व्यापारी भीतीपोटी टेस्ट ला तयार होत नाहीत तर अशा लोकांना नगरपालिकेने ताब्यात घेऊन त्यांची टेस्ट करावी या मागणीसाठी म्हसवड नगरपालिकेचे नगरसेवक व विरोधी पक्ष नेते अखिल काझी येत्या 13 सप्टेंबर ला नगरपालिका समोरच करणार उपोषण.























