महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : अवनि संस्था कचरा वेचक संघटना सातारा कराडअवनि संस्था गेली 5 वर्षापासून.सातारा जिल्हामध्ये कचरा वेचक महिलांच्या अधिकारासाठी त्यांच्या सक्षमिकरणासाठी त्यांच्या मुलांसाठी कार्यकरत आहेकचरा वेचक महिलेला पण शिक्षणाचा अधिकार आहे परंतु काही वेळा परिस्थिति सामाजिक आर्थिक या आड येत असल्यामुळे या महिला शिक्षण घेऊ शकल्या नाहीत असे त्यांच्यासोबतच्या चर्चे मधून समजले म्हणून अवनि संस्थेने कचरा वेचक महिलांचे सावित्री प्रौढ निरंतर साक्षरता अभियान सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आणि यांचा श्री गणेश कार्यक्रम आगाशिवनगर दांगट वस्ती मधील महिलांसोबत सुरू करण्यात आला यामध्ये इनरव्हिल क्लब कराड यांनी महिलांना पाटी पेन्सिल वाटप.
केले यावेळी इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा मंजुषा उमगळे, उपाध्यक्षा सिमा पुरोहित ,चार्टर्ड. प्रेसिडेंट रेखा काशीद, व कचरा वेचक वस्तिमधिल महिला केडर उपस्थित होते यामध्ये दररोज एक तास महिलांना अक्षर ओळख, अंक.ओळख, मुळाक्षरे जोडशब्द व इतर क्षमतेनुसार शिकवण्यात येणार आहे व यामध्ये स्वयंसेवक म्हणून त्याच वस्ती मधील शिकलेल्या महिला यांनी.पुढाकार घेतला या कार्यक्रमासाठी अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, यांचे मार्गदर्शन मिळाले कार्यक्रमासाठी डोनेशन च्या स्वरूपात बँनर डॉ शिला खैरमोडे, यांनी दिला व कार्यक्रमाचे नियोजन.प्रकल्प समन्वयक.राधिका लोखंडे, यांनी.केले आभार केडर पुनम मोरे, यांनी मांडले