महाराष्ट्र राज्याचे सहकार, पणन मंत्री तथा पालकमंत्री सातारा जिल्हा नामदार श्री. बाळासाहेब पाटील साहेब यांचे विशेष प्रयत्नाने कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातील खालील गावांमधील शेती पाणंद रस्त्यांना मंजूरी मिळाली असून सदर गावांमधील शेतीमाल ने-आण करणेस शेतकर्यांना सोईचे होणार आहे.
या कामांना शासन निर्णय नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) क्र. मग्रारो-2022/प्र.क्र.02/रोहयो-06अ. दि.03 मार्च,2022 ने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ते या योजनेतून मंजूरी मिळालेली आहे.
यामध्ये किवळ ता.कराड येथे चिखली किवळ शिवेवरील पाणंद रस्ता सुधारणा करणे, वाठार (कि) ता.कोरेगांव आर्वी पाणंद रस्ता दुरूस्ती करणे,पिंपरी ता.कोरेगांव सुर्ली-पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, मसूर ता.कराड पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, खोडजाईवाडी ता.कराड येथे खोडजाईमाता ते कोळवणे पाणंद रस्ता सुधारणा करणे.
, शहापूर ता.कराड यशवंतनगर गट ऑफिस ते बायपास पाणंद रस्ता सुधारणा करणे, वाठार (कि) ता.कोरेगांव शुक्रतारा ओढा ते डोंगर पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, चिखली ता.कराड नवीन ऊस बागायत पाणंद रस्ता सुधारणा करणे, मसूर ता.कराड मसूर-शहापूर-शिरवडे शिव-कॅनॉल पाणंद रस्ता सुधारणा करणे, शिरवडे ता.कराड कुयाचा पाणंद रस्ता तयार करणे, पेरले ता.कराड शेरी शिवार पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, हणबरवाडी ता.कराड खिंड शिवारात जाणारा पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, हिंगनोळे ता.कराड शिवार पाणंद रस्ता सुधारणा करणे, शहापूर ता.कराड गुरव शिवार पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, कोपर्डे (ह.) ता.कराड रानमळा शिवार पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, किवळ ता.कराड हरी पवार शिवार पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, दुर्गळवाडी ता.कोरेगांव दुर्गळवाडी-कोपर्डे रस्ता ते वॉटर सप्लाय विहीरीकडील रस्ता सुधारणा करणे, हरपळवाडी ता.कराड जि.प.शाळा ते मुरूड पंढरपूर रस्ता दुरूस्ती करणे, चोरजवाडी ता.कराड महादेव मंदिर खिंडीपर्यंतचा रस्ता दुरूस्ती करणे, तुकाईवाडी ता.सातारा तुकाईवाडी ते दुर्गळवाडी रस्ता सुधारणा करणे, नांदगांव ता.सातारा येथे पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, खोजेवाडी ता.सातारा रमना शिवार पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, नांदगांव ता.सातारा महादेव शिवार पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, वाठार (कि) ता.कोरेगांव पिंपरी-सुर्ली पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, कोपर्डे ह.ता.कराड कोपर्डे-सैदापूर पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, पिंपरी ता.कोरेगांव नेहरवाडी पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, सासुर्वे ता.कोरेगांव येथील रा.मा.142 ते चव्हाणवाडी रस्ता सुधारणा करणे, कोपर्डे ह.ता.कराड पुई ते पांडर पाणंद रस्ता दुरूस्ती करणे,(नदीकडुन) बोरगांव ता.कोरेगांव इनाम पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, नेहरवाडी ता.कोरेगांव मुलानकी शिवार पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, दुर्गळवाडी ता.कोरेगांव दुर्गळवाडी ते तुकाईवाडी पाणंद रस्ता सुधारणा करणे, कोपर्डे ह.ता.कराड सर्वळ ते बेंद पाणंद रस्ता सुधारणा करणे, रहिमतपूर ता.कोरेगांव रहिमतपूर ते हजरवाडी रस्ता दुरूस्ती करणे, बोरगांव ता.कोरेगांव बोरगांव ते कामेरी रस्ता दुरूस्ती करणे, भुषणगड ता.खटाव पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, वडगांव (ज.स्वा.) ता.खटाव पिराचामळा पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, मसूर ता.कराड एम.एस.ई.बी.ऑफिस ते सुनिल शेटे यांच्या शेतापर्यंतचा रस्ता सुधारणा करणे, (पाळक शिवार) मोहितेवाडी ता.कोरेगांव धरण ते तारगांव स्टेशन ते मोहितेवाडी जुन्या रस्त्यापर्यंतचा पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, वराडे ता.कराड येथील वराडे हनुमानवाडी पाणंद रस्ता सुधारणा करणे, कोपर्डे ह. ता.कराड डीकण पाणंद रस्ता खडीकरण करणे, चोरजवाडी ता.कराड ते हरणे वस्तीकडे जाणारा पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, तळबीड ता.कराड चव्हाण मळ्याकडे गेलेला पाणंद रस्ता सुधारणा करणे, मसूर ता.कराड येथील पावक्ता रस्ता- जोतिबा मंदिर ते ओढ्यापर्यंतचा रस्ता सुधारणा करणे, मसूर ता.कराड येथील लाटे यांची पट्टी ते वाडकर वस्ती पर्यंतचा रस्ता सुधारणा करणे, मसूर ता.कराड येथील कॅनॉल ते जकुरडा आई मंदिरापर्यंतचा रस्ता सुधारणा करणे, पाडळी ता.कराड पाडळी ते गायकवाडवाडी पाणंद रस्ता सुधारणा करणे, कोपर्डे ह. ता.कराड येथे मसूर पाणंद रस्ता (रेल्वे कडील) सुधारणा करणे, रहाटणी ता.खटाव येथील निकम मळा व चन्ने मळा पाणंद रस्ता दुरूस्ती करणे, किवळ ता.कराड येथे गावतळे ते चिखली शिवेपर्यंतचा पाणंद रस्ता सुधारणा करणे, कोपर्डे ह. ता.कराड कोंडर पाणंद रस्ता खडीकरण करणे, वराडे ता.कराड वराडे ते दरे पाणंद (डोंगराकडे) रस्ता सुधारणा करणे आदी कामांचा समावेश आहे.