सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत कोरोना बाधित कर्मचाऱ्यांची तसेच अधिकाऱ्यांची माहिती घेऊन त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हा परिषदेकडील अधिकारी व कर्मचारी यांना बाधीत होण्याचे प्रमाण वाढत आहे त्याचा संपूर्ण पाठपुरावा घेण्यासाठी तालुका स्तरावर आणि जिल्हास्तरावर विशेष कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करून सातत्याने पाठपुरावा घेण्यात येत आहे अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक शाखा अभियंता शिक्षक कंत्राटी कर्मचारी कार्यालयीन सर्व कर्मचारी यांची माहिती जिल्हा परिषदेकडून उपलब्ध करण्यात आली आहे त्यासाठी विशिष्ट लिंक ची निर्मिती करण्यात आली आहे तालुकास्तरावरील कर्मचाऱ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून एका अधिकाऱ्याची निवड करण्यात आली आहे
प्रभारी सहाय्यक प्रशासन अधिकारी सहाय्यक प्रशासन अधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून काम करतील जिल्हा परिषदेकडील बाधित अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती गुगल मध्ये वेळच्यावेळी भरून सदरची माहिती अद्ययावत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे जिल्हास्तरावर दोन अथवा तीन तालुक्यांसाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे
सामान्य प्रशासन विभाग आणि विधी कक्षातील हे अधिकारी असून ते अधिकारी या सर्व बाधित कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा करतील त्यांना वारंवार दूरध्वनीद्वारे संपर्क साधतील बाधित कर्मचारी आयसोलेशन मध्ये आहेत अथवा हॉस्पिटलमध्ये आहेत याची चौकशी करतील जर लक्षणे अधिक आढळल्यास आणि त्रास होत असल्यास त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची कार्यवाही करतील घरामध्ये संबंधित कर्मचारी उपचार घेत असल्यास त्यांना किट पुरवले आहे अथवा नाही तसेच घरी वैद्यकीय सुविधा वेळेत मिळतात की नाही तसेच प्रकृती कशी आहे याबाबत चौकशी करतील त्यांचा दूरध्वनी क्रमांक बाधित कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे
कर्मचारी आणि अधिकारी जर बाधित असतील तर त्यांची काळजी घेण्यासाठी हा विशेष उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असल्याची माहितीदेखील मनोज जाधव यांनी दिली कोरोना नियंत्रणासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा होईल असे देखील ते म्हणाले























