महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : बिदाल
25 सप्टेंबर रोजी माळशिरस येथे धनगर आरक्षण कृती समिती महाराष्ट्र कार्यकारणीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची अमलबजावणी तात्काळ होणे करिता दिशा ठरवणेसाठी सविस्तर चर्चा करण्यात आली
या चर्चेनुसार आगामी काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणा बरोबरच धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढील प्रमाणे सर्व कार्यवाही तातडीने करणेबाबत सर्वानुमते ठरले त्याप्रमाणे दिनांक 1 आक्टोंबर रोजी तमाम महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी खालील प्रमाणे शांततेने निवेदन देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय सुभाष पाटील खेमनर हे होते , सदर बैठकीसाठी दादासाहेब काळे, परमेश्वर कोळेकर, डॉ मारुतीराव पाटील, बजरंग नाना खटके, गणपतराव वाघमोडे, शिवाजीराव ईजुगडे, विठ्ठलनाना पाटील, शिवाजीराव पाटील, पांडुरंग तात्या वाघमोडे, विष्णु देशमुख ,बजरंग नाना गावडे, पंकज देवकते, अमोल खरात, किरण गोफणे, व आदी मान्यवर उपस्थित होते.




















