महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :बारामती
बारामती शहरामध्ये ६५ जणांचे नमुने तपासण्यात आले होते. त्यापैकी ६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये भिकोबानगर येथील नागरिकानंतर बारामती शहरातील कसबा येथील ६७ वर्षीय नागरिकाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
बारामती शहरामध्ये काल दिवसभर बारामतीतील ६५ जणांची कोरोना चाचणी घेण्यात अली होती. त्यामध्ये ६३ जणांचे नमुने निगेटिव्ह आले होते तर भिकोबा नगर येथील एका जेष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचे सकाळीच स्पष्ट झाले आहे. त्यानंतर प्रतीक्षेत असलेला अहवाल पॉझिटिव्ह आला असून बारामती शहरातील कसबा येथील ६७ वर्षीय जेष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाली आहे.
तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणीही घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक काम असेलतरच सर्व खबरदारी घेऊनच घराबाहेर पडावे मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टंनसिंग पाळावे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. असे या वेळी सांगण्यात आले आहे.