महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :कराड
सातारा जिल्ल्हाचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य बांधकाम मंत्री मा. ना.एकनाथजी शिंदे साहेब यांना जनसेवा करत असताना त्यांना कोरोना लागण झाली व त्यांना जुपीटर हॉस्पिटल येथे अॅडमिट करण्यात आले. त्यांना दीर्घ आयूष्य लाभो व त्याची कारोना मधून मुक्ती होहुन लवकरच जनसेवेत रुजू होवो आशी शिवसेना सातारा जिल्ह्याचे मा. जिल्हा प्रमुख संजय मोहिते (दादा) याच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर, सातारा व कराड येथे शिवसेनेच्या वतीने महादेवाला व आई जगदंबेस साकडं घालण्यात आले.

मा.एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्हाची मान महाराष्ट्र भर उंचवलेली आहे व त्यांनी समाज सेवेचे वृत हाथी ठेऊन खा.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन वतीने सर्व महाराष्ट्र भर आंब्युलंस वाटप केलेल्या आहेत व जे गरजु लोक ठाणे येथे जातात त्यांना मदतीचा हा मिळत असतो असे आमचे आधारस्तंभ मा.एकनाथ भाई शिंदे यांना महादेव व आई जगदंबेने उदंड आयुष्य देवो असे मनोगत श्री.संजय (दादा) मोहिते यांनी समस्त सातारा-कराड शिवसेनेच्या वतिने मांडन्यात आले. यावेळी आनंदयात्री संघटना व फाऊंडेशनचे संस्थापक श्री.अक्षय संजय मोहिते तसेच आशुतोष मोहिते, पांडुरंग यादव, आकाश माने, स्वप्निल चंदनशिवे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.






















