सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपने खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली असून आज गुरुवारी गांधी मैदान येथून भव्य मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीच्या महारॅलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत खासदार उदयनराजे भोसले उमेदवारी अर्ज दाखल करतील. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख सुनिल काटकर यांनी दिली.
या महारॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद आबा पाटील, आमदार जयकुमार गोरे, नामदार महेश शिंदे, नामदार नरेंद्र पाटील, माजी आमदार मदनदादा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार दिलीपराव येळगावकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपचे लोकसभा समन्वयक अतुल भोसले, जिल्हा बँक चेअरमन नितीनकाका पाटील, मनोजदादा घोरपडे, श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले, भाजप महिला आघाडीच्या चित्रलेखा माने-कदम, विक्रमबाबा पाटणकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, वसंतराव मानकुमरे, भरत पाटील, आरपीआयचे अशोकबापू गायकवाड, सचिन नलवडे, प्रियाताई शिंदे, सुरभीताई भोसले, शिवसेनेचे शरदराव कणसे, अण्णा वायदंडे, कांताताई नलवडे, रामकृष्ण वेताळ, युवराज कांबळे, शारदाताई जाधव, राजेंद्रसिंह यादव, अविनाश कदम, राजू भोसले, भरतकाका मुळे, पैलवान धनाजीकाका पाटील, अमिदादा कदम, सुनील खत्री, आनंदराव शेळके, नितीनराव भरगुडे-पाटील, अनिरुद्ध गाढवे, उदयदादा कबुले, अनुप सुर्यवंशी, विजय नायकवडी, विराज शिंदे, रविराज देसाई, निशांत पाटील
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मसमभाव संकल्पना राबवली. तोच विचार उराशी बाळगून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले गेली ३० वर्षे नागरिकांची सेवा करत आहे. नागरिकांचे भरभरून आशीर्वाद त्यांना मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकारने गेली दहा वर्षे विविध विकास योजनांच्या माध्यमांतून देशाला एका उंचीवर नेवून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मोदीजीनी प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेले आहेत. छत्रपती उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेण्यासाठी येत्या लोकसभा निवडणूक भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत.
खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जय्यत तयारी केली असून महायुतीची महारॅलीचे आयोजन केले आहे. ही महारॅली सकाळी ११ वाजून ५० मिनिटानी गांधी मैदान येथून सुरू होणार असून गोलबाग-मोती चौक-देवी चौक-कमानी हौद-शेटे चौक, पोलिस मुख्यालय, गीते बिल्डिंग, शिवतिर्थ पोवई नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सांगता होईल. तरी या महारॅलीसाठी सर्वानी लाखोंच्या संख्येंने उपस्थित रहावे. अशी माहिती प्रसिद्ध प्रमुख सुनिल काटकर यांनी दिली
































