महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : कोरेगाव
काेरेगांव नगरपंचायतीच्या नुतन उपनगराध्यक्षा मंदा किशाेर बर्गे यांचा काेरेगांव शहर विकास मंचचे अध्यक्ष व खरेदी विक्री संघाचे संचालक किशाेर बर्गे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
साेमवारी नुतन उपनगराध्यक्ष म्हणून साै. बर्गे यांची निवड झाल्यानंतर त्यांचा काेरेगाव विकास मंचच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बाेलताना किशाेर बर्गे म्हणाले, काेरेगांव शहराला विधायक चेहरा देण्यासाठी मंदा बर्गे सातत्याने प्रयत्नशिल असतात, आपल्या प्रभागाला संपूर्ण काेरेगांव शहरात आदर्श बनविण्यात हातखंडा असलेल्या साै. बर्गे यांच्या कामाची पाेहाेच म्हणून त्यांची उपनगराध्यक्षपदी झालेली निवड सार्थ असून त्यांच्याहातून निश्चितच काेरेगांव शहरात दिशादर्शक काम उभे राहिल. त्यांना काेरेगांव विकास मंचचे कायम सहकार्य राहिल असा विश्वासही किशाेर बर्गे यांनी व्यक्त केला.
सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन उपनगराध्यक्षा साै. मंदा बर्गे म्हणाल्या, या निवडीसाठी व्यक्त केलेला विश्वास मी निश्चितच चांगल्या कामातून सार्थ ठरवेन.
कार्यक्रमास युवा नेते किशाेर बर्गे, विकास मंचचे कार्याध्यक्ष दिलीपराव बर्गे, पुंडलिक भुतकर, राजु बागवान आदींसह परिसरातील नागरिकांची यावेळी प्रमुख उपस्थिती हाेती.
































