कराड : कराड येथील स्वर्गीय वेणूताई चव्हाण उपजिल्हा शासकीय रुग्णालयात नवीन नामांकित उच्च दर्जाचे सिटी स्कॅन मशीन शासनाने जनतेच्या सोयीसाठी उपलब्ध करणे बाबत.मनसे कराड शहर-तालुका- मनसे कामगार सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य श्री योगेश खडके यांचे कडून आग्रही मागणीसाठी
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग संचालक मुंबई -उपसंचालक पुणे, डॉ. कदम साहेब यांना समक्ष भेटून सविस्तर चर्चा करून लेखी पत्र मनसे कामगार सेनेचे श्री योगेश खडके यांचेकडून देण्यात आले
गेले अनेक वर्षांपासून सिटी स्कॅन मशीन बंद अवस्थेत आहेत. स्थानिक प्रशासकीय पातळीवर 3 वेळा दुरुस्ती करता लाखो रुपये खर्च करून ही मशीन बंद अवस्थेत / नादुरुस्त आहे. कराड शहर व उपनगरातील आसपासच्या ग्रामीण भागातून गोरगरीब सर्वसामान्य जनता वैद्यकीय उपचारासाठी कराड येथील शासकीय रुग्णालयात दाखल होत असतात. सध्या कोरोना महामारी संकट काळात कोरोना रुग्णांची एच आर सी टी चाचणी स्कॅन करने अनिवार्य आहे. परंतु शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅन मशीनच्या गैरसोयीमूळे असंख्य गोरगरीब जनतेला सिटी स्कॅन करता खाजगी हॉस्पिटलमध्ये पाच हजार ते आठ हजार रुपये खर्च करावे लागतात ते खर्च आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहेत सिटी स्कॅन चाचणीसाठी गोर गरिबांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या करता शासनाने कराड येथील शासकीय स्वर्गीय वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात नवीन नामांकित उच्च दर्जाचे सिटी स्कॅन मशीन ताबडतोब जनतेच्या सोयीसाठी उपलब्ध करून दयावेत. अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कराड शहर -तालुका मनसे कामगार सेनेच्या माध्यमातून लेखी पत्र देणेत आले याप्रसंगी मनसे कामगार सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य, योगेश खडके, जिल्हा सहसचिव चंद्रकांत पवार, भानुदास दाहींगडे मलकापूर शहर अध्यक्ष, स्वप्नील गोतपागर, गिरीश मोहिरे, भगवान गावडे, महिला पदाधिकारी सौ भारती गावडे उपस्थित इतर पदाधिकारी उपस्थित होते