महाराष्ट्र न्यूज महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर येथील एकाला २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो असे खोटे सांगून कर्ज प्रक्रियेकरिता फिर्यादी कडून सुमारे ३,१०,८८५/- (तीन लाख दहा हजार आठशे पंच्याऐंशी) रुपये घेतल्याप्रकरणी मिलिंद किनी रा पुणे व संजय बालिका रा औरंगाबाद यांच्या विरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात भादवी ४२०,३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फिर्यादी,सुनील भाऊ ढेबे रा हॉटेल कृष्णा,महाबळेश्वर यांनी याबाबतची तक्रार दाखल केली असून ०९ एप्रिल २०१९ ते ०९ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत मिलिंद किनी व संजय बालिका यांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी सुनील भाऊ ढेबे यांना २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो असे खोटे सांगून कर्ज प्रक्रियेकरिता सुमारे ३,१०,८८५/- (तीन लाख दहा हजार आठशे पंच्याऐंशी) रुपये घेऊन कर्ज मंजूर न करता व घेतलेले पैसे परत न दिल्याने फिर्यादी सुनील भाऊ ढेबे यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात मिलिंद किनी रा.८३ ए / १४ प्लॉट नं ११ प्रेमलोक पार्क चिंचवड,पुणे व संजय बालिका रा औरंगाबाद यांच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे महाबळेश्वर पोलिसांनी भादवी ४२०,३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात केला आहे याबाबतचा तपास पो नी बी ए कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो हवा संदीप साबळे करीत आहेत.