पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथील आय. एस.ओ.मानांकनप्राप्त छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ. सोपान नामदेव चव्हाण यांची व व्हाईस चेअरमनपदी श्रीकांत प्रभाकर शेटे यांची एकमताने निवड करण्यात आली. ८ विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून ५२ शाखाविस्तार करीत १००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाकडे गतिमान वाटचाल सुरु असलेल्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे मुख्यालय पिंपोडे बुद्रुक येथे झालेल्या सभागृहात चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाचे निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी संस्थेच्या नुतन चेअरमनपदी डॉ. चव्हाण व व्हाईस चेअरमनपदी शेटे यांची निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे,संचालक सुरेशबापू साळुंखे,अशोकराव लेंभे,रावसाहेब लेंभे,हणमंतराव निकम, तात्यासाहेब ढमाळ,भरत साळुंखे, जयवंत घोरपडे, हणमंतराव पवार, गौतम कांबळे, बाबूराव काकडे,संजय भोसले, श्रीमती सुलभा साळुंखे,सौ.उषा पवार उपस्थित होते. मावळते चेअरमन हणमंतराव पवार यांनी नुतन चेअरमन डॉ. सोपान चव्हाण यांचा व मावळते व्हाईस चेअरमन बाबूराव काकडे यांनी नुतन व्हाईस चेअरमन श्रीकांत शेटे यांचा सत्कार केला. छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन २०२१-२०२२ ते २०२६-२०२७ बिनविरोध पार पडली. गेली ३० वर्षापासुनसंस्थेची निवडणूकबिनविरोध होत आहे. असे मत संस्थेचे संस्थापक तथा संचालक, सा.जि.म.सह.बॅकलि.सातारा यांनी व्यक्त केले. तसेच निवडणुक निर्णय अधिकारी मा. प्रिती काळे सोसहाय्यक निबंधक सहकारी संस्था, कोरेगाव. यांनी दि. ०४/०२/२०२२ रोजी अविरोधनिवडणूकीचे निकालपत्र संस्थेला दिले. तसेच नवनिर्वाचित संचालकांची पहिली सभाअध्यासी अधिकारी मा. प्रिती काळे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, कोरेगाव यांचेअध्यक्षतेखाली दि. २३/०२/२०२२ रोजी पार पडली. नवनिर्वाचित संचालकांच्या पहिल्याबादक चर्चा होवून संस्थेच्या चेअरमन पदासाठी डॉ श्री. सोपान नामदेवचव्हाण यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. डॉ. श्री. सोपान नामदेव चव्हाणहे संस्थेचे २००३ सालापासुन संचालक म्हणून कामकाज करीत आहेत. तसेच सन २०१२-२०१३ या सालात त्यांनी व्हा. चेअरमन पदाची सुत्रे हाती घेतली व संस्थेची घोडदौडप्रगतीच्या दिशेने चालू ठेवली ते हुशार व अनुभवी असल्यामुळे संस्थेचा कारभार करतानात्यांना त्याचा फायदा झाला. त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा संचालक मंडळाच्या मनावरउमटविला, त्यांनी केलेल्या कामाची पोहोच पावती म्हणून संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकमंडळाने त्यांची संस्थेच्या चेअरमनपदी एकमताने बिनविरोध निवड केली.तसेच संस्थेच्या व्हा. चेअरमनपदासाठी श्री. श्रीकांत प्रभाकर शेटे, सातारा यांचीएकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. श्री. श्रीकांत प्रभाकर शेटे हे संस्थेच्यास्थापनेपासुन संस्थेचे सभासद आहेत. संस्था प्रगती पथावर आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटाआहे. संस्था स्थापनेपासुन ते सातारा शाखेचे प्रमुख मार्गदर्शक सल्लागार म्हणून कामकाजपाहत आहेत. तसेच २०१७ पासुन संस्थेचे स्विकृत संचालक म्हणून कामकाज पाहत आहेत.त्यांचा स्वता: चा सहकाराचा गाढा अभ्यास आहे. त्याचा फायदा संस्थेला नक्कीच होईल.तसेच संस्थेच्या कामकाजात ते सातत्यपुर्ण योगदान देतील. त्यांच्या चांगला कामाची पोहोचम्हणुन संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने त्यांची संस्थेच्या व्हा. चेअरमनपदीएकमताने बिनविरोध निवड केली.





















