महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी उंडाळे :
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी विलासकाकांनी उंडाळे विभागात रयत सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली होती. त्यास यश आले असून आज रयत कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे ‘अथणी- रयत’ च्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हीच प्राधान्याने जोपासले जात असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी नमूद केले.
शेवाळेवाडी (तालुका कराड) येथील अथणी – रयत साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या प्रारंभप्रसंगी बोलत ते होते. अध्यक्षस्थानी अथणी शुगर चे संचालक योगेश पाटील होते यावेळी उपाध्यक्ष आप्पासाहेब गरुड रवींद्र देशमुख विनोद पाटील उपस्थित होते उंडाळकर म्हणाले, “नैसर्गिक व मानवी कारणांनी रयत सहकारी साखर कारखाना अडचणीत सापडला होता. या कारखान्याची विक्री होते की काय, अशी अवस्था हसताना संस्थापकांच्या प्रयत्नातून ‘अथणी शुगर्स’ बरोबर करार करून सहकारी कारखानदारी राखण्यात यश आले आहे.
यावेळी ८२ कोटींची देणगी होती. पण, चार वर्षात तब्बल ६० कोटींची देणी भागवल्या ने रयत कारखान्याची वाटचाल उर्जितावस्थेतकडे सुरू आहे”. गतवर्षीच्या उसास २७६५ रुपये प्रतिक्विंटल एफआरपी असताना एक रकमी २,८०० रुपये दर दिला असून यावर्षी २,८६५ रुपये हे एफआरपी आहे. प्रत्येक पंधरवड्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करणार असल्याची घोषणा यावेळी योगेश पाटील यांनी केली. रवींद्र देशमुख यांचेही भाषण झाले. संचालक पंजाबराव देसाई यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याचे संचालक जयवंतराव मोहिते यांनी आभार मानले.