महाराष्ट्र न्यूज लोणंद प्रतिनिधी: : बिलकीस शेख
लोणंद नजिक खेड बु. येथील तुळशवृंदावन धरण पुर्ण क्षमतेने भरुन वाहु लागले आहे यातील पाण्याचा विसर्ग हा खेमावती नदीत येऊन लोणंद येथील खेमावती नदी ला पुरस्थिती आली आहे व या नदी वरिल श्री म्हस्कोबानाथ मंदीर समोरील पुल तसेच लोणंद शिरवळ रोड मटन मार्केट जवळील पुल पाण्याखाली गेला आहे.
रात्री लोणंद शिरवळ मार्गावरिल या पुलावरून पाणी वाहत असल्याने पुलाचा अंदाज येत नसल्याने वाहतुक व्यवस्था कोलमडून गेली होती या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून नगरपंचायत व पोलीस स्टेशन वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी या शासकीय यंत्रणांच्या मदतीने कोणताही अनुचित घटना घडू नये म्हणून परिश्रम घेताना निदर्शनास येत होते.