पाटण प्रतिनिधी : सातारा जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. डिजिटल बँक व विमा ग्राम योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन विभागीय विकास अधिकारी शंकरराव मोरे यांनी केले.सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने नेरळे गावात डिजिटल सेवेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रामापुर शाखा संलग्न बँकेच्या विविध योजना राबविण्याबाबत धोरण आखले आहे या धोरणानुसार गावातील सर्व बँकेच्या सभासदानी या योजनांचा लाभ घ्यावा व आपली आर्थिक प्रगती साधावी. याबाबत कोणतीही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. असे आवाहनही शंकरराव मोरे यांनी केले आहे.
यावेळी शाखाप्रमुख विजय माने व इक्बाल हकिम यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास बँकेचे विकास अधिकारी आय ए हकीम रामापुर शाखेचे शाखाप्रमुख विजय माने, नेरळे गावचे सरपंच , विकास संस्थेचे चेअरमन , व्हाईस चेअरमन, सर्व ग्रामस्थ, बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.




















