महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
मागील तीन चार दिवसापासून पडणाऱ्या परतीच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यासह अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे.तसेच कराड मध्ये मुसळधार पाऊस पडत असल्या कारणाने आज कराड मधील कराड विटा मुख्य मुख्य मार्गावर पाणीच पाणी पाहायला मिळाले. प्रामुख्याने कृष्णा कॅनॉल पासून सोसायटी विभागात तील मार्गावर गुडघाभर पाणी होते. पायी चालणारे लोकांना व वाहनधारकांना पाण्यातून वाट काढण्यात खूप अडचण निर्माण होत आहे. त्यातच या मार्गावर अगोदरच खूप खड्डे निर्माण झाले आहेत आणि त्यात या पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे लोकांना व नागरिकांना त्या पाण्यामुळे खड्डे कुठे आहेत हे समजत नाही.
त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा तर परतीचा पाऊस आहे पण मुख्य पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा असे रस्त्यावर पाणी येणे हे प्रामुख्याने होतच आहे. याठिकाणी पाण्याचा योग्य निचरा होत नाही गटारातील व नाल्यातील पाणी व सोडून रस्त्यावर येत आहे पाणी निचरा होण्यासाठी व्यवस्थित रित्या पर्यायच नाही प्रशासन याची कितपत दखल घेते याची नागरिक वाट पाहू लागले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना खूप मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या परिसरातील नागरिकांमधून असंतोषाची लाट निर्माण होत आहे.