महारष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
साळशिरंबे गावाने नेहमीच काँग्रेसच्या विचारांना साथ दिली आहे त्यामुळे यापुढे साळशिरंबे गावच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी खात्री माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. साळशिरंबेतील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, साळशिरंबे ग्रामस्थांनी पहिल्यापासूनच कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. विलासराव पाटील-उंडाळकर काका यांच्यावर प्रेम करणारे हे गाव आहे. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गावातील रस्त्यांसह सभामंडप, विद्युत पुरवठा, शेतीच्या पाण्यासाठी बंधारे अशी काही विकासकामे मार्गी लागली आहेत. या पुढच्या काळातही गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करतानाच निधीची कमतरता भासू देणार नाही.
त्यासाठी नेत्यांनी गावाच्या विकासाचा आराखडा तयार करून तो सादर करावा. त्याला निधी दिला जाईल. यावेळी ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य यांच्यासह तुकाराम पाटील, पै. तानाजी चवरे, रवींद्र उर्फ तात्यासाहेब पाटील, सुरेश पाटील, जालिंदर देशमुख, धनाजी पाटील, रंगराव देशमुख, सुनील चवरे, एम.डी. पाटील यांच्यासह मान्यवर, विविध क्षेत्रातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.