महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : पाटण
अतिवृष्टी व पुरामुळे पाटण मतदारसंघातील शेतीचे झालेल्या नुकसानीची माहिती पाटण मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी सातारा येथे झालेल्या आढावा बैठकीमध्ये विधान परिषद सभापती नामदार रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांना दिली. अतिवृष्टी व पुरामुळे पाटण तालुक्यातील शेतींचे प्रचंड नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करावे व या पंचनाम्यातून एकही बाधित शेतकरी राहू नये अशी सूचना यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.
शेती नुकसानीचे पंचमनामे करण्याचे काम सुरु आहे. या पंचनाम्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन तसा नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी या बैठकीत केल्या.आपण येत्या आठवड्यात संपूर्ण आढावा घेणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ.दिपक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हाधिकारी शेखर सिंग आदी मान्यवर अधिकारी वर्ग उपस्थित होते.