माण तालुक्यातील संभूखेड येथील प्रकार
दहिवडी : ता.०६
मालकी हक्काच्या जागेतील झाडे तोडल्याप्रकरणी नवनाथ ज्ञानदेव बागल(रा.संभूखेड, ता.माण)या शेतकऱ्याने संबंधितांवर कारवाईची मागणी वन विभागाकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
त्यांनी वनविभागाला दिलेल्या तक्रार अर्ज असे म्हटले आहे की, माझ्या मालकीच्या जागेतील गट नंबर २२/१ व २२/२मधील असणारी लिंब,बाभूळ, करंज, निरगेल,इत्यादी प्रकारची एकूण १५ झाडे माझ्या पूर्व परवानगीशिवाय संबंधित जागेची कोर्टात केस चालू असताना दादासो भानुदास साळुंखे आणि लक्ष्मण दादासो साळुंखे (दोघेही रा.इंजबाव,ता.माण)यांनी २६एप्रिल २०२४ रोजी सकाळी अकरा वाजता तोडली आहेत. सदर झाडे तोडली जात असताना पोलीस पाटील समक्ष हजर असल्याचेही त्यांनी अर्जात म्हटले आहे.
एकंदरीतच बेकायदेशीरपणे झाडे तोडणाऱ्या संबंधित व्यक्तींवर आपल्या विभागामार्फत योग्य ती कारवाई करण्याची मागणी ही त्यांनी दिलेल्या अर्जात केली आहे.