लोणंद येथे MB’s Cafe या नवीन हॉटेल उदघाटन प्रसंगी जागतिक वन दिनानिमित्त सातारा सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्री.धर्मवीर सालविठ्ठल व खंडाळा सामाजिक वनीकरण चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री संतोष चव्हाण यांचे वतीने विविध वृक्ष प्रजातीचे वाटप करण्यात आले. पराग शिंदे व अक्षय माने यांच्या नवीन हॉटेल च्या उद्घाटनप्रसंगी धर्मवीर साल विठ्ठल आणि संतोष चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती सातारा सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्री धर्मवीर साल विठ्ठल
यांच्या हस्ते फित कापून हॉटेल चे उद्घाटन करण्यात आले यावेळी जागतिक वन दिनाचे औचित्य साधून धर्मवीर साल विठ्ठल व संतोष चव्हाण यांच्यावतीने आंबा पिंपळ जांभूळ वड चिंच इत्यादी प्रजातीच्या रोपांचे वाटप करण्यात आले आणि वन विषयी जनजागृतीचे संदेश देण्यात आले वाढत्या शहरीकरणाबरोबर त्याच प्रमाणात जंगले वाढली पाहिजे आणि निसर्गाचा समतोल राखला गेला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन श्री संतोष चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केले