माती परीक्षण ही काळाची गरज आहे: डॉ. बी.एम. खांडेकर
पाटण प्रतिनिधी: माती परीक्षण ही काळाची गरज आहे यामुळे शेतात नक्की कोणते पिक घ्यावे हे समजते व पिकांना द्यावयाची खतांची मात्रा ठरविता येते असे मत कृषी केंद्र कालवडेचे प्रमुख वरिष्ठ माती परीक्षण शास्त्रज्ञ डॉ. बी. एम. खांडेकर यांनी व्यक्त केले ते बाळासाहेब देसाई कॉलेज मध्ये रसायनशास्त्र विभागाच्या वतीने राज्यस्तरीय माती व पाणी परीक्षणावर राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यशाळेसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून बोलत होते.या राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपविभागाचे डॉ. पी.वाय. पाटील व कृषी केंद्र कालवडेचे प्रमुख वरिष्ठ माती परीक्षण शास्त्रज्ञ डॉ. बी. एम. खांडेकर उपस्थित होते.तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. पवार होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. व्ही.ए. कळंत्रे, नॅक समन्वयक डॉ. प्रशांत फडणीस, डॉ. एम.आर. कदम, डॉ. पी.डी. कांबळे यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. खांडेकर म्हणाले की, माती परीक्षण ही काळाची गरज आहे. माती परीक्षणामुळे पिकासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यकता असते हे समजते त्यामुळे योग्य खते व बी बियाणे वापरता येतात व उत्पादनामध्ये भरघोस वाढ होते.
त्यासाठी प्रत्येक गावात माती परीक्षणाची प्रयोगशाळा असणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.कार्यशाळेचे दुसरे मार्गदर्शक डॉ. पाटील म्हणाले की खते व कीटकनाशकांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनींचे सत्व नष्ट होत आहे.त्याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे.त्यामुळे सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे.असे सांगून डॉ. पाटील यांनी पर्यावरण शास्त्र विभागात विद्यार्थ्यांना कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याचे ही मार्गदर्शन केले.यावेळी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. व्ही.ए. कळंत्रे यांनी पदवी व पदव्युत्तर विभागाच्या कामाचा आढावा घेतला.कार्यक्रमाचे अध्यक्ष दो. एस. डी.पवार म्हणाले आपला देश शेतीप्रधान आहे.योग्य मार्गदर्शनाअभावी पिकांचे व्यवस्थापन करता येत नाही त्यामुळे शेती तोट्यात जाते. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने मातीचे परीक्षण करावे व योग्य पिकांची निवड करावी नक्कीच या माती परीक्षणामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. एम.आर. कदम यांनी केले तर आभार प्रा.डॉ. पी.डी.कांबळे यांनी मानले कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयातून प्राध्यापक विद्यार्थी व काही शेतकरी बांधव उपस्थित होते.