नगरपालिकेकडून बसस्थानकाची साफसफाई
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड येथील कृष्णा घाटावर नदीपात्रात राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत साफसफाई करत सुमारे दोन ट्रॅक्टर कचरा गोळा करण्यात आला. पालिका पदाधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता. दरम्यान नगरपालिकेने येथील बसस्थानकाची स्वच्छता करून ट्रॉलीवर कचरा गोळा केला.
शहरातील गब्बर ग्रुपने पालिकेच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवली. कृष्णा घाटावर नदीपात्रात स्वच्छता करण्यात आली. यामध्ये नियोजन सभापती विजय वाटेगावकर, नगरसेविका विद्या पावसकर, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, सामाजिक कार्यकर्ते जयंत बेडेकर, शिवाजी पवार, रणजीत पाटील, जानकी थोरात आदींनी सहभाग घेतला. याव्यतिरिक्त पालिकेचे कर्मचारी, अधिकारी ही स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. नदीपात्राची स्वच्छता करून सुमारे दोन ट्रॅक्टर कचरा गोळा करण्यात आला.
कराड पालिका सार्वजनिक ठिकाणांची सातत्याने स्वच्छता करत असून, येथील बसस्थानक व परिसर पालिकेने स्वच्छ केला. बसस्थानकातील सर्व कचरा गोळा केला. सुमारे ट्रॅक्टरवर कचरा जमा करण्यात आला. मुख्याधिकारी रमाकांता डाके यांच्या सुचनेनुसार नोडल ऑफिसर आरडी भालदार यांच्या सूचनेनुसार मुकादम मारुती काटरे यांनी बस स्थानकाची स्वच्छता केली. याबद्दल बस स्थानक व्यवस्थापक तसेच प्रवाशांनी पालिकेला धन्यवाद दिले आहेत.






















