महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले(कळंब – इंदापूर)
१ ऑगस्ट २०२० रोजी कळस ( ता. इंदापूर ) येथे महाआघाडी सरकारच्या विरोधामध्ये एल्गार दूध बंद आंदोलन करण्यात आले , महाआघाडी सरकारच्या विरोधामध्ये जोरजोरात घोषणा देण्यात आल्या या वेळेस भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य बाबासाहेब चवरे , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माऊली चवरे तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती आघाडीचे प्रदेश चिटणीस युवराज मस्के , किसान मोर्चाचे रमेश खारतोडे , पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष गजानन वाकसे तसेच संतोष कांबळे उपाध्यक्ष पुणे जिल्हा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा , बाळासाहेब पानसरे रणजीत पाटील , विलास खारतोडे , बाळासाहेब भांडवलकर यांनी आपल्या भाषणातून सरकारच्या विरोधामध्ये रोष व्यक्त करून सरकारचा जाहीर निषेध केला.
या आंदोलनामध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं तर महाविकास आघाडी हे शेतकऱ्यांच्या दुधाच्या बाबतीत अपयशी ठरलेले सरकार आहे , हे शेतकऱ्यांच्या हिताचं नसून , शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे , शेतकऱ्यांची फसवणूक केलेले हे सरकार तीन पक्षाचे सरकार आहे , एक आंधळ्याची भूमिका निभावते , एक बहिर्याची भूमिका निभावते आणि एक मुक्याची भूमिका निभावत असलेले सरकार आहे , हे तिन्ही पक्षाच सरकार झोपेचं सोंग घेतलेलं सरकार असून झोपलेल्याला जागे करता येते परंतु झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही . इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र राज्याचे दुग्धविकास राज्यमंत्री यांची टिव्हीवर मुलाखत असताना, त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला कि , दुधाचे दर कशामुळे कमी केले त्यावेळेस त्यांनी उत्तर दिले की मला माहित नाही दुधाचे दर कधी कमी झाले हे असे त्यांनी चुकीचे उत्तर दिले राज्याचे दुग्ध विकास मंत्री हे अज्ञान असून राज्याच्या दुग्धविकास मंत्र्यांना अभ्यासाची गरज आहे , त्यांनी माहिती घेऊन अभ्यास करून उत्तर द्यायला हवं होतं .
एक लिटर दूध तयार करण्यासाठी किती रुपये खर्च येतो हे राज्याच्या दुग्ध विकास मंत्र्यांनी माहिती घ्यायला हवी व त्यानुसार संपूर्ण अभ्यास करून पशुखाद्य किती लागते त्या गाईला चारा किती लागतो , याचा सर्व अभ्यास करून मग ते ठरवायला पाहिजे. पाण्याची बॉटल २० रुपयाला आहे आणि दुधाचा आजचा दर १७ ते १८ रुपये लिटर आहे , भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये दुधाच्या दरासाठी अनुदान दिले जात होते ते अनुदान या सरकारच्या काळात बंद केले , भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळामध्ये ३२ ते ३५ रुपये एका लिटर दुधाला दर मिळत होता , परंतु या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये खासगी दूध संघांना प्रोत्साहन देण्यासाठी व खासगी दूध संघ मोठे करण्यासाठी आणि सहकारी संघ बंद होण्यासाठी हा सरकारचा डाव आहे या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची लूट चालवली आहे , महाविकास आघाडी सरकार दारूच्या दुकानासाठी प्रोत्साहन देत आहे , परंतु शेतकऱ्यांच्या दुधास दर दिला जात नाही , दुधास योग्य दर मिळाला पाहिजे असे परखड मत इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे अध्यक्ष रणजीत ( काका ) पाटील यांनी मांडले . समारोप बाळासाहेब पानसरे सरचिटणीस भाजपा इंदापूर तालुका यांनी केला . याप्रसंगी नवनाथ खारतोडे , सतीश भोसले , शहाजीराव कांबळे , राहुल कांबळे , हनुमंत निंबाळकर आबासाहेब थोरात असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .