विना लाईट वाहन चालवून चालकाने प्रवाशांच्या जीवाशी जीवघेणा खेळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे , याबाबत सविस्तर बातमी अशी –
” एस.टी चा प्रवास , सुखाचा प्रवास ” अशी टॅग लाईन वापरून , आणि खरोखरच प्रवाशांना सुरक्षित प्रवासी सेवा देवून , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जनसामान्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे , शाळा-कॉलेज च्या मुलांपासून ते अगदी आबालवृद्धां पर्यंत ” लाल परी ” ही प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. अलीकडेच शासनाने महिला वर्गाला अर्ध तिकीट केल्यामुळे एस.टी ची क्रेझ भलतीच वाढली आहे.
पण आज रात्री 8.30 वाजता “एम.एच 11बी एल 9454” (स्वारगेट – कराड) ही गाडी विना लाईट , रात्रीच्या काळोखात , गाडी भरून प्रवासी वाहतूक करताना उंब्रज हायवेवर निदर्शनास आली . गाडी सुरू करताना , चालकाने गाडीचे ब्रेक , लाईट हे तपासून घेतले होते की नव्हते , गाडीला जर लाईट नव्हते तर त्याची तक्रार चालकाने कंट्रोल रूम ला का केली नाही , अशा अवस्थेत गाडी चालवताना जर एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल प्रवासी करत होते , या गोष्टीची दखल घेवून महामंडळ त्या चालकावर कोणती कारवाई करणार ? की ही जबाबदारी झटकून हात वर करून मोकळे होणार , हे बघणे औत्सूक्याचे आहे.