महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी / गणेश पवार:
फलटण शहरातील कुरेशी नगर मंगळवार पेठ येथे नगरपालिकेच्या शाळेजवळ बेकायदेशीर दोन वाहनांमध्ये जबरदस्तीने भरलेली एक ते दीड महिने वयाची सुमारे ३६ लहान वासरे व रेडे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पकडली असून पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून सदरची फिर्याद पो कॉन्स्टेबल मुकेश घोरपडे यांनी दाखल केली असून आरोपीकडून एक पिकअप ५लाख २१०००/ एक टेम्पो १० लाख८००००/ व एक ९०००/ रुपये किमतीचा मोबाइलला असा १७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून फलटण पोलिस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दिनांक ११/३/२१रोजी रात्री पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार नगरपालिकेच्या शाळेजवळ दोन वाहनात बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी लहान वासरे भरली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या ठिकाणी पोलिसांनी छाप टाकला असता एक पांढर्या रंगाचे पिकअप नं एम एच ११ टी ५९९८ व आयशर टेम्पो नं. एच १२एल टी ७६६६ या दोन वाहनांमध्ये एक ते दीड महिने वयाची सुमारे ३६ वासरे व रेडे दाटीवाटीने भरल्याचे आढळून आले त्या नुसार आरोपी १)हुसेन बालाजी कुरेशी वय ५५ २)तय्यब आदम कुरेशी वय ४३ ३)अल्ताफ जमील कुरेशी वय २० वर्ष ४) उमर अस्लम कुरेशी वय ३०वर्ष सर्व राहणार कुरेशी नगर मंगळवार पेठ फलटण व अल्लाउद्दीन सुलतान सय्यद वय ५७ रा फडतरवाडी ता फलटण जि सातारा यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम ९ (ब) ,५(ब) व प्राणी छळ अधिनियम ११(१) (अ) नुसार गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पो हवा रमेश फरांदे करीत आहेत.






















