पणदरे ता.बारामती येथे जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक तसेच आपल्या सर्वांचे लाडके नेते रामोशी समाजाचा ढाण्या वाघ,रामोशी समाजाची मुलुख मैदानी तोफ म्हणून ज्यांना ओळखले जायचे कोणतेही आंदोलन असो की मोर्चे असो,किंवा समाजात कुठेही अन्याय होऊ द्या भाऊ जर बोलायला उठले तर समोरच्या च अंगावर काटा उभा राहयचा.
असे स्वर्गीय बबनरावजी आण्णासो खोमणे उर्फ भाऊ यांच्या निवासस्थानी येऊन कुटुंबातील त्यांची पत्नी असतील किंवा त्यांची मुले,मुली नातवंडे असतील यांचा खुप मोठा आधारवड गेला याना आधार व त्यांचे सांत्वन करण्यासाठी रामोशी बेरड,बेडर समाजाचे खंबीर असे नेतृत्व लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब(संस्थापक अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य) उपस्थित होते.
यावेळी नाना बोलत असताना म्हणाले की भाऊ नि जो समाज जागृत ठेवण्यासाठी जो लढा उभा केला यासाठी आपलं आख आयुष्य घालवले असा भाऊ ना समाज कदापिही विसरणार नाही
भाऊंचा स्वभाव अतिशय मनमोकळा,काम करण्याची पद्दत खुप वेगळी,भाऊ कधीही कोणाला मोठा किंवा लहान समजत नव्हते,महाराष्ट्र मधले अस कोणतं गाव,वाडी वस्ती भाऊंना सर्व माहीत होते अस एक पोलिस स्टेशन नव्हते की भाऊंना ओळखत नव्हते.स्टेशन चे कोणतेही काम असो भाऊंचे सर्व कायदे कलम पाठ होते.

भाऊ बद्दल बोलावे तेवढं कमीच आहे.त्यांची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही आणि काढणार पण नाही.तुम्हाला कसलीही अडचण आली तर सर्व समाज मदत केल्या शिवाय राहणार नाही असे मत नाना नि शेवटी यक्त केले..
यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने,युवक उपाध्यक्ष किरण खोमणे,पैलवान विनोद बोखारे,महादेव कोकरे(रा.स.प.बारामती),युवा नेते प्रविण जगताप,सचिन गायकवाड,अनिल कदम,गायकवाड सर,दत्ता चौगुले तसेच भाऊ च्या कुटुंबातील सर्व जण उपस्थित होते.
शब्दांकन
पैलवान नानासाहेब मदने
अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा






















