महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / दहिवडी
माण तालुक्यात मुंबई आणि पुणेकर गावाला येण्याच्या अगोदर या तालुक्यात एकही रुग्ण सापडला नव्हता. जसे मुंबई. पुणे वाले आले तसें रुग्ण संख्या झपाट्याने वाढली, असाच पुण्याहून आलेला एक युवक डॉक्टर कडे उपचारासाठी आला होता.. काही दिवसांनंतर तो युवक पॉसिटीव्ह आल्याने. डॉक्टरलाही तपासण्यात आल्यानंतर रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्याने तालुक्यातील प्रशासन आणि जनता हादरून गेली असून. तालुक्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.. डॉक्टर अनुभवी आणि नामवंत असल्यामुळे रोज तपासणी साठी खेड्या पाड्यातून अनेक लोक येत होते. यामध्ये दहिवडी परिसरातील 200 च्या आसपास लोकांना विलगीकरण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन दहिवडी शहर बफर झोन तर बिदाल रोड आणि सिद्धनाथ मंदिर परिसर मायक्रो कॉंटेन्मेन्ट झोन म्हणून घोषित करण्यात येणार आहे तरी. मायक्रो काँटेंमेंट झोन चौदा दिवस पूर्णपणे बंद राहणार असून बफर झोन मधील अत्यवश्यक सेवा फक्त सुरु राहणार आहे
ReplyForward |