महाराष्ट्र न्यूज कळंब इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
१३ ऑगस्ट रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करून संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक तहशील कार्यालयासमोर धनगर बांधव ऐक्य अभियान मार्फत राज्यातील प्रत्येक तहशील कार्यालयामध्ये स्वतःच्या रक्ताने लिहून निवेदन देणार आहे .
धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरीत करा , धनगर समाजाच्या विकासासाठी घोषीत केलेल्या २२ योजनांची अंमलबजावणी करा व १००० कोटीची तरतूद ताबडतोब करा . मेंढपाळांना संरक्षण द्या , व त्यांच्यावर होणारे हल्ले थांबवा .यासाठी राज्यभरातून आपल्या मागण्यांसाठी धनगर बांधव स्वतःच्या रक्ताने लिहून तहशिलदार मार्फत राज्य सरकारला निवेदन देणार आहे . यामध्ये सरकारला १५ दिवसांचा वेळही दिला जाणार आहे . त्यानंतर राज्यभर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात धनगर समाज अतिशय उग्र आंदोलन घोषीत करणार असल्याचे डाॅ. शशिकांत तरंगे यांनी सांगितले .