सातारा :
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरानजीक ऑक्सिजन टँकरला गळती लागली. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून ते लिकेज थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, घटनास्थळी सातारा पोलिसांनी धाव घेतली आहे
सायंकाळी सहा वाजता कोल्हापूरच्या दिशेने निघालेला ऑक्सिजनचा टँकर अचानक थांबला. यावेळी टँकरमधून मोठ्या प्रमाणात आवाज येऊ लागल्याने ड्रायव्हर घाबरला. खाली उतरून पाहिले असता टँकरच्या पाठीमागून ऑक्सिजन गळती सुरू झाली होती