कराड : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी कराड सोसायटी गटात अत्यंत चुरशीने झालेल्या मतदान प्रक्रियेत आज सकाळी दोन्ही उमेदवारांकडून सहलीवर पाठवलेली मतदार कराड येथील शिवाजी हायस्कूल मधील मतदान केंद्रावर येऊन मतदान केले आहे. अद्यापही मतदान करण्याचे काम सुरूच आहे. कराड सोसायटी गटात 140 पैकी दहा ते बारा टक्के मतदान अद्याप झालेले नाही. शिवाय सोसायटी मतदार संघातील दोन्ही उमेदवारांनी अद्यापही आपला मतदानाचा हक्क बजावलेला नाही.
कराड सोसायटी मतदार संघात येथील शिवाजी स्कूल मध्ये मतदान केंद्र असून मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात चारी बाजूला मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर साईबाबा मंदिरासमोर अॅड.उदयसिंह पाटील गटाच्या बूथ तर शिवाजी हौसिंग सोसायटीत बाळासाहेब पाटील गटाचा बूत उभारण्यात आला आहे. दोन्ही बुथवर मोठ्या प्रमाणात उमेदवार समर्थकांनी गर्दी केली आहे.




































