महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : बिलकीस शेख (लोणंद)
लोणंद येथील इनरव्हील क्लब लोणंद डिस्ट्रिक 313 आणि इनरव्हील क्लब अंबरनाथ हिल्स् 314 यांच्या संयुक्तपणे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अविरतपणे काम करत असलेल्या पोलिस बांधवांना खजूर वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.
लोणंद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांना लोणंद इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डाॅक्टर स्वाती शहा आणि इनरव्हील क्लब अंबरनाथ हिल्स डिस्ट्रिक्ट 314 च्या अध्यक्ष अंजली वारके यांच्या सहकार्याने आयएसओ स्वाती जगताप यांनी खजूर वाटप केले तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीचे कौतूक केले. यावेळी लोणंद इनरव्हील क्लब च्या अध्यक्ष स्वाती शहा सेक्रेटरी शिल्पा शहा आणि आय एस ओ क्षमा शहा यांनी इनरव्हील क्लब अंबरनाथ हिल्स च्या आय एस ओ स्वाती जगताप यांचा सत्कार केला.

यावेळी लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि संतोष चौधरी तसेच पोलिस सहकारी , इनरव्हीलच्या शानू चंद, दर्शना रावळ , बिल्कीस शेख आदि मान्यवर मास्क व सामाजिक अंतराचे भान राखत उपस्थित होत्या.






















