मोरगाव,बारामती ता.०६ -: मोरगाव फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना विलिनीकरण रुग्ण कक्ष दोन दिवसामध्ये सुरु केला जाणार…
सुनील निंबाळकर / बारामती प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोरगाव परीसरात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आरोग्य विभाग , मोरगाव ग्रामपंचायत , मोरगाव फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना विलिनीकरण रुग्ण कक्ष दोन दिवसामध्ये सुरु केला जाणार आहे. यामध्ये पन्नास रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. याबाबतची पाहणी आज बारामती प्रांताधीकारी दादासो कांबळे यांनी केली असल्याची माहीती सरपंच निलेश केदारी यांनी दिली .
कोरोना या विषाणूजन्य आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभाग , मोरगाव ग्रामपंचायत , माहेश्वरी भक्त निवास ,मोरगाव फाऊंडेशन , जय गणेश प्रतीष्ठाण ,संस्कृती युवा प्रतीष्ठाण यांच्या सहकार्याने कोरोना रुग्ण विलगीकरण कक्ष सुरु केला जाणार आहे . ज्या रुग्णांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे . मात्र लक्षण काही नाहीत अशा रुग्णांना आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार या विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे .
या विलगीकरण कक्षामध्ये निवासी आरोग्य अधीकारी व कर्मचारी असणार आहेत . मोरगावसह परीसरातील सर्व रुग्णांना आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार या सेंटरमध्ये दाखल करून घेतले जाणार आहे. हे कोरोना सेंटर सुरु करण्यासाठी गावातील काही दानशूर व्यक्ती , खाजगी व्यवसाय करणारे वैद्यकीय अधीकारी , माहेश्वरी भक्त निवास ,चिंचवड देवस्थान ट्रस्टने आदींनी वस्तूरुपाने व आर्थिक सहकार्य केले आहे .
या सेंटरची पाहणी बारामती प्रांताधीकारी दादासाहेब कांबळे ,गटविकास अधीकारी राहुल काळभोर , तालुका वैद्यकीय अधीकारी मनोज खोमणे , राष्ट्वादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी पाहणी . यावेळी सरपंच निलेश केदारी , वैद्यकीय अधीकारी बेलदार मॅडम , ग्रामसेवक मोरेश्वर गाडे आदी उपस्थित होते .या सेंटरमधील रुग्णांना औषधे , जेवण ,चहा ,नाश्ता , मोफत पुरवले जाणार आहे .


















