महाराष्ट्र न्युज फलटण प्रतिनिधी / गणेश पवार : काल दि ६ रोजी सातारा जिल्हा काँग्रेस कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा फलटण तालुका काँग्रेस कमिटीच्या तातडीने झालेल्या बैठकीत निषेध करण्यात आला व हल्लेखोरांना चोवीस तासात अटक करावी आणि पुन्हा असा प्रकार घडू नयेत या साठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे फलटण तालुका अध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी बेडके व काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलीयासंबंधीचे निवेदन प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप यांना देण्यात आले यावेळी तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमिरभाई शेख,उपाध्यक्ष अशोकराव शिंदे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष पंकज पवार,शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रीतम जगदाळे उपस्थित होते