नागपूर 24-भारतात अस्पृशाना जनवरापेक्षाही हिन वागणूक दिली जात होती, गुलामीचे जीवन जगणाऱ्या व मृतप्राय झालेल्या समाजाला डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी जागृत करून त्यांच्या उन्नती साठी संविधान दिले आणि विज्ञान वादी -मानवतावादी असा सर्वश्रेष्ठ बौद्ध धम्म दिला व हजारो वर्षाच्या गुलामीतून मुक्त केले.
बाबासाहेब म्हणायचे गुलामीचे मूळ गरिबीत आहे समाज आर्थिक दृष्टया मजबूत झाला पाहिजे. परंतु आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी आंबेडकरी समाजाच्या आर्थिक उत्थाणासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही एवढेच नव्हेतर राजकीय दृष्टया समाजाची एकजूट होऊ दिली नाही
आज हिच नेते मंडळी ब्राम्हणशाही मजबूत करण्यासाठी समाजासोबत गद्दारी करित आहे, हा समाजद्रोह आहे, अशा समाजद्रोही नेत्यांना आता हाकलण्याची वेळ आली आहे. या नेत्यांच्या कुबड्या सोडून आंबेडकरी समाजाने एकजूट करावी आणि राजकीय क्रांती घडवून आणावी. नागपूर आंबेडकरी चळवळीची राजधानी आहे. नव्याने चळवळीची सुरुवात येथून करावी यश मिळेल असे प्रतिपादन अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राइब महासंघ यांनी डाँ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती ओंकार नगर द्वारा बौद्ध पौर्णिमा निमित्त एन आय टी गार्डन ओंकार नगर येथे आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून व्यक्त केले, या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अजनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तमाटे साहेब,डाँ बाबासाहेब आंबेडकर संस्कृतीक संस्था नागपूर अध्यक्ष रणजित रामटेके, संदेश आनंद दैनिकचे संपादक मिलिंद पौनीपगार, संजय मुन, सुनील गवई,विचार मांचावर उपस्थित होते. रणजित रामटेके यांनी तथागत बुध्दाचे तत्वज्ञान सोप्या शब्दात सांगितले व बौद्ध धम्मा शिवाय जगात शांतता प्रस्तापित होऊ शकत नाही असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार रवीभाऊ पोथारे यांनी केले. कार्यक्रमाला मोठया संख्येने लोकं उपस्थित होते.कार्यक्रमाला रुपेश मुन,राजेश शेवाळे, प्रदीप ढाकणे, धीरज राऊत, अविनाश उपाध्याय, इंद्र आटे,राहुल सराफ नितीन रणदिवे, धीरज राऊत, राहुल सराफ यांनी सहकार्य केले विनीत -रवी पोथारे