बारामती प्रतिनिधी.
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे हे कामानिमित्त फलटण येथे गेले असता त्यांच्यावर गुंडांकडुन गोळीबार झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजत आहे.
याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि लांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा फोन स्विच ऑफ आहे, यानंतर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता ते कामानिमित्त फलटण या ठिकाणी गेले असून आम्हाला जास्त कल्पना नसल्याचे सांगितले. याबाबत बारामतीचे पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत दुजोरा दिला आहे
दोन महिन्यापूर्वी राजगड पोलिस स्टेशन हद्दीत पोलिसांच्या वेशात येऊन सराफा चे दुकान गोळीबार करत लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील आरोपींचा सुगावा लागल्याने, आज त्यांचा पाठलाग करताना, फलटण जवळ वडले गावात एपीआय लांडे, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने एका दरोडेखोराला ताब्यात घेतले असून , दोन दरोडेखोर पोलिसांच्या दिशेने गोळीबार करून ऊसाच्या शेतात पसार झाले आहेत. यामध्ये सर्व पोलिस पथक सुखरूप असून कोणालाही इजा झालेली नाही. फरार आरोपींचा शोध पुणे ग्रामीण आणि फलटण पोलीस घेत आहेत..- डॉ. अभिनव देशमुख – पोलीस अधीक्षक पुणे






















