कराड : कराड दि. 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन कराडमध्ये
साजरा करण्यात आला.
यावेळी कराडमधील लाहोटी कन्या प्रशालाशाळा कराड मधील विविध संघटना राजकीय पक्ष सामाजिक संघटना कराड नगरपरिषद नगरसेवक यांच्या सर्वांच्या वतीने संविधानाचे जनक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या समोर संविधानाची प्रतिकृती ठेवून चे पूजन करण्यात आले.
या दिवशी शाळकरी मुलींच्या मध्ये संविधान विषयी माहिती देण्यात आली. कराड शहरामध्ये संविधान रॅली कढण्यात आली. यावेळी विशेष करून या रॅलीमध्ये मुलींच्यात उत्साह दिसून आला. रॅलीमध्ये घोषणाबाजी करण्यात आली.