बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला इशारा
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / कराड :
कोरोना महामारीच्या काळातही खाजगी फायनान्स कंपनीच्या गुंडाकडून सर्वसामान्य जनतेला वसुलीच्या नावाखाली होणारी दमदाटी प्रशासनाने तात्काळ थांबवावी आणि वसूलीसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी. असे साजिद मुल्ला जिल्हाध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना सातारा यांनी मागणी केली आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे गेली दोन ते तीन महिने झाले प्रशासनाच्या वतीने सातारा जिल्ह्यात लाकडाऊन करण्यात आले सर्वसामान्य जनतेने प्रशासनाला सहकार्य केले अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले मात्र खाजगी फायनान्स बँका यांचे व्याज मात्र चालूच राहिले अक्षरशा सर्वसामान्य जनतेला हातात काम नसल्यामुळे तीन ते चार महिने घरातच बसून काढावे लागले सातारा जिल्ह्यात अंशतः लाकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली परंतु अद्यापही दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले नाहीत अशा कोरोनाच्या संकटातही खाजगी फायनान्स वाले बजाज चोलामंडलम, इक्विटास आदी फायनान्स च्या गुंडांकडून सर्वसामान्य जनतेला वसुली च्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला वसूली च्या नावाखाली दमदाटी केली जात आहेत शिवीगाळ केली जात आहे अगदी वसुलीसाठी असणार्या गुंडाकडून मारहाणीचे प्रकार ही होत आहेत ज्याप्रमाणे प्रशासन लाकडाऊन बाबत प्रशासन सातारा जिल्ह्यातील जनतेला नियम पाळण्यासाठी आदेश काढत असते त्याच प्रमाणे प्रशासनाच्या वतीने खाजगी फायनान्स बँका यांच्याकडून होणार या वसुलीसाठी सहा महिने मुदतवाढ देण्यासाठी चा आदेश काढावा खाजगी फायनान्स कंपनीच्या गुंडांकडून सर्वसामान्य जनतेला वसुली च्या नावाखाली दमदाटी चे प्रकार चालू आहेत त्या फायनान्स कंपनीच्या संबंधितांवर कारवाई करावी प्रशासनाच्या वतीने खाजगी फायनान्स बँका यांच्याकडून होणाऱ्या कर्ज वसुलीसाठी सहा महिने मुदतवाढ द्यावी जर खाजगी फायनान्स कंपनीच्या गुंडांकडून वसुली च्या नावाखाली दमदाटी चे प्रकार चालू च राहिले तर बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांना बरोबर घेऊन सातारा जिल्ह्यात सक्तीच्या कर्जवसुली विरोधात मोठं जन आंदोलन उभं करुन होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला इशारा दिला.