महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी / गणेश पवार :
फलटण : फलटण तालुक्यातील साखरवाडी याठिकाणी मागील पंधरा दिवसापूर्वी झालेल्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी राकेश ऊर्फ मोन्या निंभोरे यास फलटण व पुणे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईने काल पुणे येथे अटक करण्यात आली व त्याचा ताबा फलटण पोलिसांना देण्यात आला. सख्या मेव्हण्याचा खून करून फरारी झालेल्या आरोपीला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे . राकेश रमेश निंबोरे ( वय २५) रा . साखरवाडी , ता . फलटण यास अटक केली असून . त्याला फलटण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पथकाने सापळा रचून राकेश(मोन्या) निंबोरे याला ताब्यात घेतले . चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली . ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ . प्रियंका नारनवरे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे , एपीआय अभिजीत पाटील , शाम सूर्यवंशी , वैभव स्वामी , राकेश क्षीरसागर , ऋषीकेश दिघे , समीर माळवदकर , सचिन सरपाले यांनी केली .