महाराष्ट्र न्यूज / कोळकी प्रतिनिधी : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मातोश्री श्रीमंत अनंतमालादेवी विजयसिंहराजे नाईक निंबाळकर यांचे मंगळवार दि.२७ जुलै २०२१ रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. या निमित्ताने माजी केंद्रीय कृषिमंत्री व विद्यमान खासदार शरद पवार यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची फलटण येथील ‘‘सरोज व्हीला‘‘ या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली.
या वेळी विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सहकारमंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील, आमदार दिपकराव चव्हाण, फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर-निंबाळकर, बारामती नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सदाशिवराव सातव व उद्योजिका प्रिती प्रभाकर घार्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.