महाराष्ट्र न्यूज कऱ्हाटी प्रतिनिधी :
काऱ्हाटी येथे नवरात्र महोत्सव साध्या पद्धतीने कोरोनाच्या महामारीमुळे काऱ्हाटी येथील यशवंतराय मंदिरामध्ये नवरात्र महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. नऊ दिवसाचे धार्मिक कार्यक्रम ही गर्दी च्या अनुषंगाने रद्द करण्यात आले आहेत.
काऱ्हाटी (ता. बारामती) येथील ग्रामदैवता मधील अकरा मंदिरांमध्ये सामुदायिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली.
सर्वधर्म समभावाने नांदत असलेले गाव म्हणून काऱ्हाटीची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे गावांमध्ये 11 ठिकाणी घट बसविण्यात आले. यशवंतराय ,भैरवनाथ, लक्ष्मीआई ,मारुती, जुने ठाण ,यमाई, जानाई, जुनी जाणाई विविध वस्तीवरील मंदिरे साफसफाई करून अभिषेक करून सामुदायिक पद्धतीने धान्य गोळा करून ते वाटप करून घट बसविण्याची प्रथा आजही पाहायला मिळते. सॅनिटायझर चा वापर करून सोशल डिस्टंसिंग पाळून विधिवत प्रथा साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.