राज्यात लोक अदालतीत 7 लाख 83 हजार 898 दावे निकाली .
फलटण : शनिवार दि. 25 सप्टेंबर रोजी राज्यभरात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोक अदालती मध्ये ई-चलनासह दाखल पूर्व आणि प्रलंबित दाव्यांची पैकी एकूण 7 लाख 83 हजार 898 दावे निकाली काढण्यात आले आहेत.
त्यामध्ये 2 लाख 40 हजार 119 दावे पुणे जिल्ह्यातील विविध न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीत निकाली काढण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वात दावे निकाली काढणे आणि सर्वाधिक तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे असे पुणे जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव प्रदीप सावंत यांनी सांगितले आहे.
सातारा जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यात बारा ठिकाणी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 1580 प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोडीने 29 कोटी 29 लाख 79 हजार 311 रुपये इतकी वसुली झाली आहे. तर 16 हजार 206 वादपूर्व प्रकरणांमध्ये चार कोटी 22 लाख 43 हजार 210 एवढी रक्कम वसूल झाली आहे. त्याचप्रमाणे वाहतूक शाखेकडील मोटर वाहन अधिनियमाखालील ही चलनाची 2305 पाच प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामधून एकूण 39 लाख 45 हजार 550 दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. या लोका अदालतीचे उद्घाटन गुगल मीट वरून करण्यात आले होते.