कराड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज होणारी शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी व त्यांना महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची आरोग्य मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी शिवसैनिकांनी मंदिरात जाऊन अभिषेक व आरती केली.
आज पहाटे कराडमध्ये सर्व पदाधिकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या वतीने कराडमध्ये अभिषेक व आरती करण्यात आली.
यावेळी उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक, उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, शंकर वीर, शहरप्रमुख शशीराज करपे, उपशहर प्रमुख अक्षय गवळी, साजिद मुजावर, माजी नगरसेवक प्रमोद वेर्णेकर, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक ज्ञानदेव भोसले, हर्षद धोत्रे, प्रसिद्धी प्रमुख अजित पुरोहित, शाखाप्रमुख भार्गव शिंदे व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.