फलटण : फलटण येथील कोळकीतील 24 वर्षीय युवतीनं झिरपवाडी (ता. फलटण) येथील एका विहिरीत आत्महत्या केली.
अनघा विष्णू नाळे महादेवनगर, कोळकी असे संबंधित युवतीचं नाव आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, अनघा नाळे ही मिसिंग असल्याचे फलटण शहर पोलिस ठाण्यात दाखल होते. तीचा शोध घेत असताना, तीचे मामा व मित्र, नातेवाइक व पोलिस यांना २८ सप्टेंबर रोजी सकाळ सातच्या सुमारास झिरपवाडी गावच्या हद्दीत सित्याची पट्टी नावाच्या शिवारातील सीताराम शंकर गुंजवटे यांच्या मालकीच्या विहिरीतील पाण्यात अनघाचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
याबाबत मेघराज पोपट बोराटे (वय २९, रा. फरांदवाडी, ता. फलटण) यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत. फिर्याद दाखल केलीय. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.