आज दि 21/6/2024 रोजी, मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर काष्ट्राईब महासंघाच्या शिस्तमांडलास भेटीची वेळ देण्यात आली होती.
अतिशय व्यस्त कार्यक्रमात मा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी काष्ट्राइब शिस्टमंडळास भेट देऊन विविध मागण्याचे निवेदन देऊन चर्चा केली.
परदेशी शिष्यवृत्ती बाबत यावर्षी अनु सूचित व बौद्ध विध्यार्थी यांचेवर समानतेच्या नावावर अन्याय करण्यात आला.शासनाने बार्टी सारथी महाज्योती द्वारा विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व प्रशिक्षण बाबतच्या योजना राबविण्यासाठी समानतेचे धोरण आणले. परंतु अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती ही बार्टी द्वारा देण्यात येत नाही. तर 2003च्या शासन निर्णयानुसार विशेष घटक योजने मार्फत राबविली जात आहे,व याच विशेष घटक योजनेतर्गत निधी उपलब्ध केल्या जातो,
आर्टिकल 46अन्वये अनुसूचित जातीला वयोमर्यादा, शैक्षणिक गुण व उत्पन्न याबाबत सूट देण्यात येते त्यामुळे अनु जाती व इतर समाजाची तुलना होऊ शकत नाही. म्हणून यावर्षी परदेशी शिष्यवृत्ती साठी लादलेल्या अटी बेकायदेशीर व संविधान विरोधी आहे, त्या सर्व अटी तात्काळ रद्ध कराव्यावसुधारित आदेश जारी करावे ,.
सातारा येथील डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी,या निवास स्थानाचे घर मालकउदय आमणे हे आता सर्व न्यायालईन प्रकरणे मागे घेण्यास काष्ट्राईब संघटनेला हमी दिली असल्याने योग्य मोबदला देऊन डाँ बाबासाहेबचे सातारा निवास स्थानवर राष्ट्रीय स्मारक निर्माण करावे.
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे या मागण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले. यावर लवकरच बैठक आयोजित करून प्रश्न निकाली काढणार असे स्पष्ट आश्वासन मा मुख्यमंत्री यांनी काष्ट्राइब शिष्ट मंडळास दिले. याप्रसंगी मा अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राईब, नागपूर विभागीय अध्यक्ष मा विनोदजी बनसोड, नितीन परदेशी, डाँ संजय पवार, अशोक देशमुख, गोपाल श्रीमंगले, संतोष कुंभार, उपस्थित होते… – सिताराम राठोड, प्रसिद्धी सचिव आणि उपमाहासचिव काष्ट्राईब