फलटण : साखरवाडी ता. फलटण येथे अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी किशोर बुद्धदास खुंटे रा. साखरवाडी याच्यावर पोक्सोअंतर्गत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातीन मिळालेल्या माहितीनुसार, दि २६ रोजी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत शौचालयच्या रस्त्याने अल्पवयीन पीडित मुलगी घरी जात असताना, तिच्या ओळखीचा किशोर खुंटे हा संशयित मोटारसायकलवरून तिथे आला व त्याने काहीही न बोलता अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करण्यास सुरुवात केली. सदर घटनेबाबत ‘कुणाला काही बोललीस तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकील’ अशी धमकी देऊन तो मोटारसायकलवरून निघून गेला. त्यानंतर या घटनेबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे करीत आहेत.