कराड : भारतीय जनता पार्टी सचिव व ओबीसी मोर्चा पाटण तालुक्याचे आण्णा मारुती कारंडे यांनी कृषी विभाग पाटण तालुका यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनमान्य योजना त्यांच्या शेतात राबवली फळबाग, अन्य सर्व फळांची झाडे महाराष्ट्र शासन योजनाच्या मार्फत शेतकऱ्यांना मोफत दिली जातात. या योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने कृषी विभाग अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यानी आज कारंडे यांच्या महाराष्ट्र शासन मार्फत केलेल्या लिंबूच्या बागेला आज भेट दिली.
कारंडे यांनी केलेल्या लिंबू बागेचे कौतुक अधिकाऱ्यांनी केले. यावेळी आण्णा मारुती कारंडे मु. पो. मंद्रुळकोळे,यांच्या लिंबू बागेची पाहणी तालुका कृषी अधिकारी पाटण एस. एस. ताकटे, मंडळ कृषी अधिकारी एस. टी. नेवसे, कृषी सहायक ए. बी. पवार, एन. एस. मुळीक, पी. एम. गाढवे त्यांची सर्वांची प्रमुख उपस्थिती होती.