महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर देखील वेगवान घडामोडी सुरूच आहेत. पक्षात पडलेल्या फुटीविरोधात आणि बंडांविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. फुटीमुळे तयार झालेला शिंदे गट आणि ठाकरे सेना यांच्यात शिवसेनेच्या चिन्हावरून देखील वाद होऊ शकतात. असं झाल्यास याचा फैसला निवडणूक आयोगाला करावा लागेल. ११ जुलै ला आमदारांच्या अपात्रेबाबतच्या खटल्यावर सुनावणी होणार आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना नव्या चिन्हाची तयारी ठेवा असं आवाहन केलं आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात शिवसेनेच्या अस्तित्वाबाबतची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यातच कोणीही गाफील राहू नका आणि गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केल्याने पुढची लढाई सोपी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय म्हणालेत नेमकं उद्धव ठाकरे
सर्वतोपरी लढाई लढू पण चिन्ह हातून गेल्यास नव्या चिन्हाची तयारी ठेवा कमीत कमी कालावधीमध्ये नवं चिन्ह लोकांपर्यंत पोहचावं म्हणून कामाला लागा कायद्याने जो लढा द्यायचा आहे तो देऊच, पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तर गाफील राहू नका. शिवसेनेला जे काही चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघऱी पोहोचवा शिवसेनेची पुढील लढाई तितकी सोपी असणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपसह शिंदे गटाचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे तर शिवसेनेचे राज्यात काय अस्तित्व असणार हे देखील सिद्ध होणार आहे.