जेजुरीच्या श्रीखंडेराया चरणी अभिषेक
पाटण : महाराष्ट्राचे प्रसिद्ध देवस्थान जेजुरीच्या श्री खंडेरायाच्या चरणी श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर (दादा) यांच्या उदंड आयुष्यासाठी भंडाऱ्याचा अभिषेक घालण्यात आला. या अभिषेकाचा प्रसाद महाराष्ट्रातील प्रसिद्ध निसर्ग पर्यावरण प्रेमी छायाचित्रकार विजयकुमार हरिश्चंद्रे, प्रसिद्ध शिल्प कलाकार महेंद्र थोपटे यांनी प्रत्यक्ष दादांना भेटून ७८ व्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा’ च्या रुपाने खंडेरायाचा प्रसाद भेट दिला. या शुभेच्छा स्विकारताना दादांनी श्री खंडेरायाचे स्मरण केले.
निसर्ग, पर्यावरण प्रेमी प्रसिद्ध छायाचित्रकार विजयकुमार हरिश्चंद्रे यांना पाटणच्या वैभवशाली निसर्गाने प्रेमात पाडले आहे. पाटणच्या खोऱ्यातील अनेक छायाचित्रे त्यांनी इंग्रजी, हिंदी, मराठी दैनिकातून जगप्रसिद्ध केली आहेत. फेब्रुवारी – मार्च महिन्यात पाटण – मणदुरे काऊदऱ्यावर होणारी “निसर्ग पुजा” या यात्रेचे ते प्रवर्तक आहेत. विजयकुमार हरिश्चंद्रे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली पाटणच्या खोऱ्यातील “निसर्ग पुजा” चे आज भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. निसर्ग पुजेची संकल्पनाच हि वेगळी आहे. व ती पाटण तालुक्यातच साजरी होत असल्याने या निसर्गपुजेचे अनेकांना आकर्षण असते. यामध्ये माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनाही या निसर्ग पुजेचे मोठे आकर्षक निर्माण झाले आहे. निसर्ग पर्यटन हे आर्थिक सुबत्ता अणनारे साधन आहे. याचा सर्वसामान्य लहान- मोठ्या व्यवसायिकांनी लाभ घ्यावा… या एकाच विचाराने एकत्र आलेल्या श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर आणि निसर्ग प्रेमी विजयकुमार हरिश्चंद्रे यांची घट्ट मैत्री झाली आहे.
या मैत्रीला उदंड आयुष्य लाभण्यासाठी विजयकुमार हरिश्चंद्रे व प्रसिद्ध शिल्प कलाकार महेंद्र थोपटे यांनी श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त जेजुरीच्या श्रीखंडेरायाला अभिषेक घातला. व अभिषेकाचा प्रसाद स्वतः हरिश्चंद्रे यांनी पाटण येथील निवासस्थानी येवून भेट दिला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.