प्रतिनिधी फलटण अनिल पिसाळ
फलटण तालुक्यातील चौधरवाडी येथील खाजगी सावकारी करणाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल फलटण पोलीस शहर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.फलटण शहर पोलीस स्टेशनच्या मिळालेल्या माहितीनुसार सचिन बाबुराव खानविलकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार चौधरवाडी येथील त्यांच्या वडिलोपार्जित जमिन मिळकत स.न. १०१/२/३ वर बाबुराव खानविलकर यांनी सन १९९७ साली संभाजी नामदेव शिंदे यांच्या कडून पैश्याची गरज असल्याने ४०.००० रु.१० .टक्के व्याजाने देण्यास तयार झाले त्यानंतर गरजेपोटी खानविलकर यांनी संभाजी शिंदे
यांना चौधरवाडी येथील ९१ आर पैकी २० आर जमीन मुदत खरेदी खत करून ४५०००.रु १० टक्के व्याजाने घेतले होते त्यांनतर वडील यांनी शिंदे यांना प्रत्येक महिना पोटी सन २००२ पर्यंत दर महा व्याज देत होते त्यानंतर त्या काळात मुदत खरेदीखत संपल्या कारणाने ४५,०००. रुपये रक्कम परत केले असे त्यांनी शिंदे यांच्या कडून लेखी लिहून घेतले होते,
नंतरच्या पुढील काळात सदर सावकारांनी १०००००रू मागणी केली असल्यामुळे वडिलांना याचा मानसिक त्रास होऊन यातच त्यांचा मृत्यू झाला याला तीन वर्ष उलटून तरीही या खाजगी सावकाराने जमिनीचा ताबा स्वतःकडेच ठेवला या सावकारा विरुद्ध खानविलकर यांना जमिनीचा ताबा न दिल्यामुळे त्यांनी हा गुन्हा फलटण शहर पोलीस ठाणे गुन्हा दाखल झालेला आहे.
खाजगी सावकार संभाजी नामदेव शिंदे रा. चौधरवाडी ता. फलटण यांच्यावर महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ नुसार ३९,४५, ५०४,५०६, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सहाय्यक फौजदार गजानन भिशे हे करत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर खासगी सावकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सातारा पोलीस अधीक्षक यांच्या कडे केले होते या स्वाभिमानी’च्या दणक्याने अखेर येथील खाजगी सावकारावर गुन्हा दाखल झाला…