महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / नीरा : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असलेल्या गोरगरिबांसाठी, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ताजीराव (आबा) चव्हाण यांनी ३५ ते ४० कुटुंबीयांना २०० किलो साखर वाटप करण्यात आली. तसेच २०० किलो गहू देखील वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे घरी बसणे ठीक आहे , परंतु रोज कामावर गेल्याशिवाय संध्याकाळी ज्यांची चूल पेटत नाही अशा लोकांवर खूप मोठे संकट आले आहे.घरी बसून परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रामुख्याने शहरातील अनेक चाळीत आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना हा प्रश्न भेडसावत आहे. यामुळेच फुल ना फुलाची पाकळी म्हणून पोलीस प्रशासन च्या हस्ते कुटुंबास साखर वाटप केली गेली.
यावेळी उपस्थित नीरा पोलिस दूरक्षेत्रचे फौजदार कैलास गोतपागार, सहाय्यक फौजदार सुदर्शन होळकर, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर व पृथ्वीराज चव्हाण, सुनिल पाटोळे, दिपक जाधव इतर उपस्थित होते.